वजराट नं.१ शाळेतील शिक्षकांचा उपक्रम
वेंगुर्ला,ता ०८:
तालुक्यातील वजराट नं.१ शाळेतील शिक्षकांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात कर्तव्य बांदिवडेकर तर मोठ्या गटात वैभवी वजराटकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत मराठी, हिदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांचा वापर करताना ३७ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
कोरोनामुळे सर्व शाळा बंद असल्या तरी अनेक शाळा व शिक्षक यांनी शिक्षण सुरु ठेवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्गांचा अवलंब करीत आहेत. वेंगुर्ला तालुक्यात गुणवत्तेत अग्रेसर असणारी वजराट नं.१ शाळाही आपली गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने मराठी, इंग्रजी वाचन व कविता गायन स्पर्धेचे आयोजन केले होते.
गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – मोठा गट (इ.५वी ते ७वी)- प्रथम-वैभवी वजराटकर, द्वितीय-अनुष्का परब, तृतीय-सृष्टी पालयेकर, चतुर्थ-कार्तिकी परब, पाचवा-विश्वजीत पेंडसे, उत्तेजनार्थ – सानिका सावंत, लहान गट (१ली ते ४थी) – प्रथम – कर्तव्य बांदिवडेकर, द्वितीय-चिन्मयी कांदे, तृतीय-तुषार परब, चतुर्थ-मंदार खरात, पाचवा-मंगेश परब, उत्तेजनार्थ-स्नेहा परब. सर्व व्हिडीओंचे मूल्यमापन कृष्णा खरात व वसुंधरा सुर्वे या दोन्ही उपक्रमशील शिक्षकांनी केले. स्पर्धेचे नियोजन शिक्षक तेजस बांदिवडेकर यांनी केले. स्पर्धेतील विजेत्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूर्यकांत परब, केंद्रप्रमुख लवू चवहाण, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे. विजेत्यांना लवकरच बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.