परशुराम उपरकरांचा पुढाकार; जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतली भेट…
कणकवली ता.०८:
सिंधुदुर्ग जिल्हाचे नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची मनसे नेते परशुराम उपरकर यांनी भेट घेतली.यावेळी जिल्ह्यातील विविध बाबींवर चर्चा करतानाच परशुराम उपरकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तसेच जिल्ह्यातील त्यांच्या कारभाराला शुभेच्छा दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची सांगली येथे बदली झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या पोलीस अधीक्षकपदी मुंबई गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त राजेंद्र दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला.त्यांची मनसे नेते परशुराम उपरकर यांनी त्यांच्या सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेतली आणि त्यांचे स्वागत केले.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखतानाच जिल्ह्यातील अनधिकृत धंद्यांवर आपला वचक असावा, जिल्ह्यातील मटका, बेकायदा दारू व्यवसाय, जुगार आदींवर कारवाई होऊन हे काळे धंदे करणाऱ्यांची गय करु नये,असेही उपरकर यांनी दाभाडे याना यावेळी सांगितले.तसेच पोलीस प्रशासनाला आपले लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच सहकार्य राहील,असेही आश्वासन उपरकर यांनी सांगितले.
यावेळी उपरकर यांनी राजेंद्र दबडे यांना त्यांच्या जिल्ह्यातील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ सचिव राजेश पांचाळे,बाबल गावडे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.