Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा शिरकाव नको...

ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा शिरकाव नको…

जिल्हा समन्वय समितीची मागणी; मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

ओरोस,ता.८:
मराठा समाजाचे ओबीसीकरण करु नका. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा शिरकाव नको. अन्यथा ‘ओबीसी आरक्षण बचाव’ आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समितीने गुरुवारी निवेदनाद्वारे दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष वासुदेव साळवी, संदीप बांदीवडेकर, नितिन कुळये, नंदकुमार आम्रसकर, रामचंद्र मांडवकर, उदय दुधवडकर यांच्यासह ओबीसी समाजातील विविध समाज बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments