उदय शिंदे ; राज्य प्राथमिक शिक्षक समिती व शिक्षण विभागाची भेटीवेळी मागणी…
ओरोस,ता.८:
सिंधुदुर्गसह कोकणातील काही जिल्ह्यात आंतरजिल्हा शिक्षक बदली संदर्भात काही समस्या निर्माण झाल्या असून सदर समस्या शासन स्तरावरून सोडविणे आवश्यक असल्याने याबाबत शासन पातळीवर प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची आंतरजिल्हा बदली व शिक्षक भरती संदर्भाने निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाशी अधिकृत भेट संपन्न झाली.यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष उदय शिंदे,जिल्हाध्यक्ष नितीन कदम,राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर,जिल्हा शिक्षक नेते नंदकुमार राणे,जिल्हा सरचिटणीस सचिन मदने,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे,जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक,जिल्हा कोषाध्यक्ष लहू दहिफळे,शिक्षक प्रतिनिधी मंगेश काळे,विष्णू लटपटे,नथू खानेकर,रणजित देवकर,रुपेश गरुड आदी उपस्थित होते.तर प्रशासनाचे वतीने प्राथ.शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर,अधीक्षक तथा प्रशासन अधिकारी विनायक पिंगुळकर,कक्ष अधिकारी श्री.डोईफोडे,कनिष्ठ सहायक संदीप जाधव उपस्थित होते.