बांदा,ता.०८: येथील आरटीओ विभागाच्या अत्याधुनिक सीमा तपासणी नाक्याच्या क्षेत्रातील बेसुमार वृक्षतोड, अवैध खनिज उत्खनन, अनधिकृत बांधकाम याविरोधात येथील शेतकरी साईप्रसाद कल्याणकर यांनी अखेर मोक्का न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयात याप्रकरणी तब्बल १८ वरिष्ठ अधिकार्यांना आरोपी केले आहे. याची सुनावणी २७ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासन पातळीवर खळबळ उडाली आहे.
बांदा येथील सीमा तपासणी नाका भूसंपादनापासूनच वादाच्या भोवर्यात सापडला आहे. चुकीच्या पद्घतीने भूसंपादन, बेसुमार वृक्षतोड, अवैध खनिज उत्खनन व परस्पर विक्री, बेकायदा बांधकामे याविरोधात शेतकरी साईप्रसाद कल्याणकर यांचा गेली ८ वर्षे न्यायालयीन पातळीवर लढा सुरु आहे. खनिज उत्खनन व विक्रीबाबत कोकण आयुक्तांनी चौकशीचे आदेश देऊनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी कनिष्ठ अधिकार्यांना पाठीशी घालत कर्तव्यात कसूर केल्याचा श्री कल्याणकर यांचा आरोप आहे. त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडाला आहे. तसेच राष्ट्रीय हरिद लवादाने टोलनाका क्षेत्रात ४४ हजार झाडे लावण्याचे दिलेल्या आदेशालाही प्रशासनाने हरताळ फासल्याचा शेतकर्यांचा आरोप आहे.
सिंधुदुर्गात मोक्का न्यायालयाची स्थापना केल्यानंतर कल्याणकर यांनी याप्रकरणाची याचिका न्यायालयात दाखल केली आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच याचिका आहे. न्यायालयाने १८ अधिकार्यांना २७ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे कल्याणकर यांच्याकडे स्पष्ट केले आहे. यामुळे प्रशासन पातळीवर खळबळ उडाली आहे.
१८ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात साईप्रसाद कल्याणकर यांची मोक्का न्यायालयात धाव…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES