Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावैभववाडीत दारू वाहतूक केल्याप्रकरणी उरण येथील एकाला अटक...

वैभववाडीत दारू वाहतूक केल्याप्रकरणी उरण येथील एकाला अटक…

करूळ चेकपोस्टवर कारवाई; आलिशान कारसह नऊ हजार सातशेची दारू…

वैभववाडी ता.०८: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी उरण-रायगड येथील एकाला ताब्यात घेतले आहे.त्याच्याकडून नऊ हजार सातशे रुपयांची दारू व तीन लाखाची कार,असा मुद्देमाल जप्त केला आहे.वेदांत घरत,असे त्याचे नाव आहे.ही कारवाई आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास करूळ चेकपोस्टवर करण्यात आली.
याबाबतची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार त्या ठीकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यानी ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments