महात्मा गांधींच्या जयंती निमित्त आरवली कार्यबल गटातून आयोजन…
वेंगुर्ले ता.०९: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आरवली कार्यबल गटातून विद्यार्थ्यांसाठी तीन गटात घेण्यात आलेल्या ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत पहिल्या गटात स्वरांगी उमेश मंत्री,दुसऱ्या गटात निमिषा संदीप देसाई,तर तिसर्या गटात शिवराम नंदकुमार घाडी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दरम्यान इयत्ता पहिली ते चौथी,पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे,गट-१ – इयत्ता पहिली ते चौथी,प्रथम क्रमांक- स्वरांगी उमेश मंत्री (इयत्ता चौथी)शाळा आरवली सखैलेखोल,द्वितीय क्रमांक – कनिका सुनील चोपडे (इयत्ता चौथी) शाळा आरवली टाक,तृतीय क्रमांक – श्रेयस एकनाथ कुडव (इयत्ता चौथी) शाळा आरवली टेंबवाडी
दुसरा गट इयत्ता पाचवी ते सातवी,प्रथम क्रमांक – निमिषा संदीप देसाई (इयत्ता सातवी) आसोली नंबर एक,द्वितीय क्रमांक – गौरव साईनाथ मराठे (इयत्ता सहावी) आरवली नंबर एक,तृतीय क्रमांक – पवन दीपक घाडी (इयत्ता सातवी) आसोली नंबर एक
गट – ३ इयत्ता आठवी ते दहावी गट, प्रथम क्रमांक – शिवराम नंदकुमार घाडी (इयत्ता दहावी) असोली हायस्कूल असोली,द्वितीय क्रमांक – युक्ता हनुमंत तांडेल (इयत्ता आठवी) टाक हायस्कूल,तृतीय क्रमांक – सिद्धेश विलास कुडव (इयत्ता दहावी) टाक हायस्कूल.
विजेत्या स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र व बक्षीस देऊन तर सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
आरवली कार्यबल गटाच्या केंद्रप्रमुख श्रीमती प्रियदर्शनी कावळे व केंद्र मुख्याध्यापिका श्रीमती वैभवी शिरोडकर, आसोली नं.१ शाळेचे मुख्याध्यापक,प्रफुल्ल ठोकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे परीक्षण शिक्षक ईश्वर थडके यांनी केले.