Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजलपर्यटन व्यावसायिकांच्या समस्या पालकमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडाव्यात...

जलपर्यटन व्यावसायिकांच्या समस्या पालकमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडाव्यात…

बाबा मोंडकर ; इन्शुरन्सची वाढीव रक्कम कशी भरायची, जलपर्यटन व्यावसायिकांना पडलाय प्रश्न…

मालवण, ता. ०९ : जिल्ह्याचा पालक या नात्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी जलक्रीडा, पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडाव्यात अशी मागणी भाजप प्रवक्ते आणि टीटीडीएस संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केली आहे.
कोरोना व्हायरस बरोबर गेले वर्षभर ओखी, क्यार, निसर्ग वादळाने संकटात असलेला जलपर्यटन व्यावसायिक जलक्रीडासाठी नियमावली (sop) जाहीर करत आहे. यांची वाट बघत बसलेला असतानाच पर्यटनाची जीववाहिनी असलेल्या सिंधुदुर्ग किल्ला फेरीस नष्ट करण्यासाठी शासन पुढे आले आहे. या मार्गावर चालणाऱ्या एका होडीत १२ पर्यटकांना नेण्याची मंजुरी असते. आतापर्यंत प्रति व्यक्ती १ लाख असलेला इन्शुरन्स वाढवून प्रति व्यक्ती ५ लाख करण्यात आला. त्यामुळे १२ व्यक्तीचा ६० लाख रुपयांचा इन्शुरन्स सामान्य होडीचालक भरणार कसा हा यक्ष प्रश्न होडीचालकांसमोर आहे. जोपर्यंत पर्यटन व्यावसायिक इन्शुरन्स रक्कम भरत नाही. तोपर्यंत लायसन्स मिळणार नाही असे सांगून बंदर विभागाने हात वर केले आहेत. हाच प्रकार स्कुबा डायव्हीग, बोटींग, वाँँटरस्पोर्टच्या बाबतीत सुरू असून हा सर्व विषय पर्यटनाशी जोडला असल्याने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
आज या व्यावसायिकांकडे इन्शुरन्स पैसे भरण्यासाठी येणार कुठून हा विचार सरकारने करून हा इन्शुरन्स व्यावसायिकांकडून न स्वीकारता ज्यावेळी बंदर विभाग प्रत्येक जलक्रीडा करताना पर्यटकांकडुन कर आकारते त्याचवेळी रेल्वे, बीएसटी, एसटी प्रमाणे विभागाप्रमाणे हा इन्शुरन्स प्रति पर्यटकांकडुन आकारावा. तसेच या क्षेत्रातील व्यावसायिकांकडून कुठलाही कर न घेता त्यांना व्यवसायास परवानगी देण्यात यावी तसेच जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांना एकत्र करून त्यांना मंजूर प्रवाशी क्षमतेच्या किती टक्के प्रवाशी वाहतूक करावी या संबंधी चर्चा करून शासनाने अधिकृत परिपत्रक (sop) जाहीर करावे. अन्यथा होणाऱ्या व्यावसायिकांच्या उद्रेकांस शासन जबाबदार राहील. आम्ही पर्यटन व्यावसायिकांच्या सोबत असून जलपर्यटन व्यावसायिकांना अपेक्षित असलेल्या बदलांसाठी पुढील काही दिवस जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी काम करावे अशी मागणी श्री. मोंडकर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments