सिंधुदुर्गनगरी,ता.०९: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे ११ व १२ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
रविवार ११ ऑक्टोबर २०२० दुपारी ४:३० वा. वाघोटण, ता. देवगड गावास भेट व पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती. सायं. ५:३० वा. देवगड येथून मोटारीने ओरोस, सिंधुदुर्गनगरी कडे प्रयाण, सायं. ७:०० वा. पोलीस मुख्यालय, शासकीय विश्रामगृग, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे आगमन, राखीव व मुक्काम.
सोमवार १२ ऑक्टोबर २०२० सकाळी ११:०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सवमेत माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम व कोरोना आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठक, दुपारी १२:०० वा. डी.पी.डी,सीच्या नुतन सभागृहात जनता दरबार, दुपारी २:०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यकारी अभियंता, कुडाळ एम.आय.डी.सी. व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा कामगार कल्याण अधिकारी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीचे पदाधिकारी यांच्या समवेत सुरक्षा रक्षकांच्या अडी-अडचणींबाबत चर्चा, दुपारी २:१५ वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे, जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी यांच्या समवेत जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटनांच्या अडी-अडचणींबाबत चर्चा, दुपारी २:३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांच्या सोबत जिल्हा दूध उत्पादक संघाचे प्रतिनिधी यांच्या समवेत चर्चा, दुपारी २:४५ वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे, प्रादेशिक अधिकारी, एम.टी.डी.सी. प्रादेशिक बंदर अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता महावितरण, पर्यटन व्यवसायिक प्रतिनिधी यांच्या समवेत जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिक यांच्या समवेत चर्चा, दुपारी ३:०० ते ४:०० राखीव, दुपारी ४:०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद, सायं. ५:०० वा. खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय ओरोस येथे अभ्यागतांच्या भेटी, सायं. ५:३० नंतर सोईनुसार ओरोस सिंधुदुर्ग येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.