घोषणांनी महामार्ग दणाणला ः उत्तरप्रदेश मधील घटनेचा निषेध…
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज सत्यशोधक संघटनेने मोर्चा काढला. येथील बुद्धविहार ते प्रांताधिकारी कार्यालय या दरम्यान निघालेल्या मोर्चात केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात सत्यशोधक संघटनेचे अंकुश कदम, स्वाती तेली, दीपक दाजी कदम, दीपक जाधव, विवेक ताम्हणकर, विकास कदम, अनघा कदम, सुमित पेडणेकर, महेश पेडणेकर, उषाकिरण सम्राट, निलिमा जाधव, राजेंद्र कांबळे, हनुमान दया आजवेलकर, रोशन कदम, साक्षी जाधव, मोहिनी तांबे, निवृत्ती तांबे, क्रांतीराज सम्राट, कृष्णा जाधव, नीलेश जाधव, सुनील कदम, राहुल कदम, रितेश तांबे आदी सहभागी होते.
हाथरस येथे दलित मुलीवरील अत्याचाराची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. घटना एकूणच भारतातील जातीव्यवस्था -पितृसत्ता आणि भांडवलशाही यांचे द्योतक आहे. पीडित मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे,तिच्या कुटुंबाला डांबून ठेवणे. हा गुन्हा दाबून टाकण्याचा संतापजनक प्रयत्न असून लोकशाही मूल्यावरच अत्याचार करण्यासारखे आहे. हाथरस मधील दलित मूलीवर झालेला अत्याचाराचा व तिच्या निधनानंतर सरकार व प्रशासनाने केलेल्या अमानवी व्यवहाराचा सत्यशोधक जनआंदोलन सिंधुदुर्ग, सत्यशोधक विद्यार्थी संघटना व सत्यशोधक महिला सभा सिंधुदुर्गच्या वतीने जाहीर निषेध करीत असल्याचे प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.