वैभव रावराणे यांनी मंगेश लोके यांना दिला प्रसिद्धीपत्रकाव्दारे इशारा
वैभववाडी/पंकज मोरे,ता.०९: मी पैसे घेतले असतील परंतु कोणालाही लाखो रुपयांचा गंडा घातलेला नाही. वैभववाडी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके हे आपल्या पुढे कोण गेला की, त्याला खाली कसं खेचतात याचा अनुभव जुन्या शिवसैनिकांना विचारावा. जर मी तोंड उघडले तर महागात पडेल. असा इशारा युवा सेना तालुका शहर प्रमुख वैभव रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिला आहे.
वैभववाडी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी गुरुवारी वैभव रावराणे यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले होते. अनेकांना गंडा घातल्याचा आरोप त्यांनी रावराणे यांच्या वर केला होता. मी माझा राजीनामा चार महिन्यापूर्वी खासदार विनायक राऊत व युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडू यांच्याकडे दिला आहे. व मी चार महिने शिवसेना कार्यालयात कार्यालयात गेलो नाही. त्यामुळे हकालपट्टी करायचा व हाकलून देण्याचा विषयच नाही. खा. राऊत यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या जवळची माहिती मी खा. राऊत यांना सांगणार असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
गितेश कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास मी आचिर्णे येथे गेलो होतो. दरम्यान घरी परतत असताना मला मारण्याचा कट आखण्यात आला होता. असा गंभीर आरोप ही रावराणे यांनी पत्रकात केला आहे.