Monday, June 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासाळेलचे माजी सरपंच मनसेत दाखल...

साळेलचे माजी सरपंच मनसेत दाखल…

 

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत केला प्रवेश…

मालवण, ता. ०९ : मालवण तालुक्यात पक्षप्रवेशाचा धुमधडाका सुरुच असुन आज सायंकाळी उशिरा शिवसेनेचे कट्टर समर्थक साळेल नांगरभाट येथील माजी सरपंच उदय गावडे यांनी समर्थकांसह माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशासाठी तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या नेतृत्वाखाली भुषण गावडे, सचिन गावडे यांनी मेहनत घेतली.
यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री, मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, मनविसेचे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, मालवण शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर, महिला आघाडी उपतालुका अध्यक्ष राधिका गावडे, रुग्वेद गावडे, भुषण गावडे, सचिन गावडे, संतोष सावंत, प्रणव उपरकर आदी उपस्थित होते.
यावेळी आपण सत्ताधारी शिवसेना पक्ष तसेच आमदार वैभव नाईक यांच्या कारभाराला कंटाळुन मनसेचे माजी आमदार जीजी उपरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मनसेत प्रवेश करत असल्याचे श्री. गावडे यांनी सांगितले.
मनसे सरचिटणीस उपरकर म्हणाले, कोरोनाच्या या काळातही आज सामान्य जनता कृष्णकुंजवर धाव घेत आहे. मग तो लोकलने प्रवास करण्यासाठी आतुर झालेल्या मुंबईतील नागरिक असो, जीम सुरु करण्यासाठी जीम मालकांचा प्रश्न असो, मंदिर उघडण्यासाठी पुजाऱ्यांनी घेतलेली भेट, राज्यातील डॉक्टरांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट, मुंबईचा डबेवाला यांनी घेतलेली भेट, कोळीवाड्यातील महिलांनी घेतली भेट, वाद्यवृंद कलाकारांची घेतलेले किंवा कालच ग्रंथालय मालकांनी घेतलेली श्री. ठाकरे यांची घेतलेली भेट आणि आज कुलाब्यात मनसेने मराठी अस्मितेसाठी केलेले खळ्ळखट्याक आंदोलन. यासर्व महाराष्ट्रातील प्रश्नांना फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे व महाराष्ट्र सैनिकच जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावून जनतेला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. यापुढे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असलेले भाजप जनतेच्या प्रश्नासाठी काहीच करू शकत नाही. हे जनतेला मनोमन पटत असल्यानेच आज मालवण तालुक्यात अनेक तरुण आणि जुने शिवसैनिक मनसेमध्ये दाखल होत आहेत.
आजपासुन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तालुक्यात पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठक घेत आहे. यामध्ये आपल्याकडे जिल्ह्यांमध्येही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे जनता आपल्या तक्रारी मांडताना दिसत आहेत. तालुक्यामध्ये असलेले प्रश्न मनसे पदाधिकारी आपल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी शासन आणि जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे अकार्यक्षम आहेत हे सिद्ध होत आहे. म्हणूनच येणारा काळ मनसेचा असेल आणि मनसेचा भगवा झेंडा येणाऱ्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत फडकेल याबद्दल दुमत नाही असेही उपरकर म्हणाले.
साळेल नांगरभाटचे माजी सरपंच उदय गावडे यांच्यासोबत सागर गावडे, विजय गावडे, ओंकार गावडे, विशाल गावडे, निलेश गावडे, मुकुंद गावडे, विकास गावडे, परेश गावडे, कृष्णा गावडे, अमित गावडे, भूषण गावडे, गंगाराम गावडे आदींनी मनसेत प्रवेश केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments