समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याने निर्णय…
कणकवली ता.०९: मराठा आंदोलकांनी १० ऑक्टोबरला पुकारलेले महाराष्ट्र बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे .मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर मराठा संघर्ष आरक्षण समितीचे सुरेश पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याची भूमिका जाहीर केली.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० ऑक्टोबरला बंद आंदोलन होणार नाही,अशी भूमिका मराठा आरक्षण संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष एस.टी. सावंत,लवु वारंग व एस.एल.सकपाळ समाजाच्या वतीने जाहीर केली आहे.
कोल्हापूर येथे गोलमेज परिषद घेऊन १२ मागण्यांचे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले होते . मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भरती बंद करा. सरकारने राज्यसेवा परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे १० तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुकारलेला बंद आम्ही तात्पुरता स्थगित करत आहोत,अशी भूमिका मराठा नेते एस.टी. सावंत यांनी जाहीर केली आहे.