सावंतवाडी
माजगाव येथे घरफोडी करून किंमती साहीत्य व लॅपटाॅप चोरी केल्या प्रकरणी परिसरात राहणा-या चोरट्याला आज तेथील पोलिसांच्या पथकाने संवाद कौशल्य वापरून तब्बल दोन तासात अटक केली. या प्रकरणात आणखी काही जण असल्याचा पोलिसांना संशय आहे.
आंबोली खून प्रकरणानंतर पुन्हा एकदा सावंतवाडी पोलिसांनी यशस्वी तपास केला आहे अरबाज शहा रा. माजगाव वय 18 असे संशयितांचे नाव असून त्याने रोहन माजगावकर या माजगाव येथील कर्मचाऱ्यांच्या घरात चोरी गेली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की येथील श्री माजगावकर यांच्या घरात चोरी झाली. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात काल रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केली त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला. यावेळी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोटे,श्री.पाटील, यांच्यासह सहकारी शरद लोहकरे, कर्मचारी नवनाथ शिंदे, देवदत्त कांडलकर,श्री .नाईक, श्री. मातोंडकर, आदींनी त्या ठिकाणी सापळा रचून व संवाद कौशल्य पणास लावून संबंधित संशयिताला माजगाव परिसरात फिरत असताना अटक केली .यासाठी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आपण चोरी केल्याची कबुली संशयिताने दिली आहे या गुन्ह्यात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे
घरफोडी केल्याप्रकरणी सावंतवाडीत दोन तासात युवकाला अटक…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES