पालिका पदाधिकाऱ्यांची मागणी; मासिक सभेत एकमुखी ठरावाने संमती…
सावंतवाडी ता.१०: केंद्र शासनाकडून नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला बांदा-संकेश्वर हा महामार्ग सावंतवाडी शहरातून नेण्यात यावा,मात्र मोती तलाव आणि राजवाडयाला कोणतीही बाधा होता नये,त्यानुसार त्याची आखणी करण्यात यावी,अशी एकमुखी मागणी सावंतवाडी पालिकेच्या बैठकीत झाली.तसा ठरावही संमत करण्यात आला.
सावंतवाडी पालिकेची सभा काल नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी नुकताच जाहीर झालेल्या बांदा-संकेश्वर या महामार्गावर चर्चा करण्यात आली.महामार्ग शहराच्या बाहेर घेऊन गेल्यास त्याचा शहरावर परिणाम होणार आहे.त्यामुळे तो शहरातुन जावा,जेणेकरून व्यवसायाला आणि शहर विकासाच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल,अशी यावर सकारात्मक चर्चा झाली.त्यानंतर एकमुखी ठराव घेऊन हा महामार्ग शहरातून जावा अशी मागणी करण्यात आली.