कमलाकर गावडे यांची टीका…
मालवण, ता. १० : साळेलचे माजी सरपंच उदय गावडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजप पक्षात प्रवेश केला होता. मग ते शिवसेना कट्टर समर्थक कसे? मनसेत प्रवेश करताना त्यांना एक वर्ष भाजपमध्ये असल्याचे सांगण्याची लाज वाटली का? असा प्रश्न पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे यांनी उपस्थित केला आहे.
माजी सरपंच उदय गावडे यांनी काल मनसे सरचिटणीस उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपण कट्टर शिवसेना समर्थक असल्याचे म्हटले होते. यावर टीका करताना श्री. गावडे म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या काळात मी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला तर उदय गावडे यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. ते गेले वर्षभर भाजप पक्षात असताना काल मनसेत प्रवेश करताना त्यांनी आपण शिवसेना समर्थक असल्याचे सांगणे हे हास्यास्पद वाटते. वर्षभर भाजपात असल्याचे सांगण्याची लाज वाटली का? असे श्री. गावडे यांनी म्हटले आहे.