सामाजिक कार्याचे कौतुक; सहकार्य करण्याचे पदाधिकाऱ्यांना आश्वासन…
सिंधुदुर्गनगरी,ता.१०: जिल्हा रुग्णालयासमोर सुरू असलेल्या शिवसेना कोविड-१९ मदत कक्षला आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी भेट दिली. शिवसेनेचे मदत कक्षाच्या कार्याबद्दल जाणून घेतले.शिवसेनेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. काहीही आरोग्य यंत्राने कडून लागणाऱ्या मदती बद्दल हक्काने सूचना करण्याचे आवाहन केले आणि शासकीय आरोग्य यंत्रणा उत्तम सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या ठिकाणी शिवसेना महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, डॉ.प्रविण सावंत, महिला उपजिल्हा संघटक ऍड.नीता सावंत, सावंतवाडी तालुका संघटक रश्मी मालवदे,विभाग प्रमुख श्री.नागेश ओरोसकर सावंतवाडी उपतालुका संघटक रुपाली चव्हाण आदी उपस्थित होते.