प्रमोद यादव ः आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूकही सुरू
कणकवली, ता.१० ः कणकवली आगारातून सुटणार्या सर्व फेर्या आता सुरू झाल्या असून पूर्ण क्षमतेने वाहतूक केली जात आहे. तसेच आंतरजिल्हा आणि आंतरराज्य वाहतुकीच्या फेर्या देखील सुरू करण्यात आल्या आहेत. या प्रवासी सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन कणकवली एस.टी.आगार व्यवस्थापक प्रमोद यादव यांनी केले आहे.
कणकवली आगारातून सुटणार्या प्रमुख फेर्यांमध्ये कणकवली- रत्नागिरी सकाळी ६.३० वाजता, पोचण्याची वेळ १० वाजता, रत्नागिरी – कणकवली १०.३० ते २.१५ वाजता, कणकवली – लातूर ( राधानगरी ) सुटणार ७.३० ते ८ वाजता, लातूर – कणकवली ( राधानगरी ) सुटणार ९ .३० ते ११.१५ वाजता, कोल्हापूर येथून- ७.३० ते १० वाजता, कणकवली – बेळगाव ७.१५ ते ११.४५ वाजता, बेळगाव कणकवली १२.३० ते ५ वाजता पोचणार, कणकवली- सांगली १२ ते ५ वाजता पोचणार, सांगली – कणकवली सुटणार ८ ते १.१० पोचणार आहे. कणकवली लातूर ५.३० सुटणार आहे. तरी या सर्व एसटी बसेसचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन कणकवली आगार व्यवस्थापक प्रमोद यादव यांनी केले आहे.