सावंतवाडी ता.१०:मनसेच्या तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक १२ ऑक्टोंबरला आयोजित करण्यात आली आहे.माजगाव येथील सिद्धिविनायक सभागृहात सकाळी ११:०० वाजता ही बैठक होणार आहे.याबाबतची माहिती तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे व सचिव विठ्ठल गावडे यांनी दिली.
यावेळी माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर,जिल्हाध्यक्ष धीरज परब,उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर,जिल्हा सचिव बाळा पावसकर आदी मार्गदर्शन करणार आहेत.तरी तालुक्यातील आजी-माजी तालुकाध्यक्ष मुंबईतील संपर्कअध्यक्ष, सहसंपर्कअध्यक्ष, उपतालुकाअध्यक्ष,विभागअध्यक्ष, उपविभागअध्यक्ष,शाखाअध्यक्ष उपशाखाअध्यक्ष, शहरातील शहराध्यक्ष, उपशहरअध्यक्ष, विद्यार्थी सेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी तसेच इतर सेलचे सर्व पदाधिकारी आजी-माजी व महाराष्ट्र सैनिक यांनी वेळेत उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची १२ ऑक्टोबरला बैठक…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES