वैभववाडी,ता.१०: उत्तर प्रदेशात हाथरस येथे वाल्मिकी समाजातील मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे.या घटनेचा वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने निषेध करण्यात आला असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे पंतप्रधान यांच्याकडे तहसिलदार यांच्या मार्फत करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे वाल्मिकी समाजातील एका १९ वर्षीय मुलीवर चार गुंडांनी बलात्कार करुन तिचा खून केला.उत्तर प्रदेश प्रशासन व पोलिस यंञणेने याची योग्य ती दखल घेतली नाही.उलट पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता त्याच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेचा तीव्र निषेध करीत असून यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.अशी मागणी निवेदनाद्वारे संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.हे निवेदन नायब तहसिलदार अशोक नाईक यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी वैभववाडी तालुका बौध्दसेवा संघाचे कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, सेक्रेटरी रविंद्र पवार, श्रीपत कांबळे, धोंडीराम तांबे, चंद्रकांत जाधव, प्रिमत जाधव आदी उपस्थित होते.
हाथरस घटनेचा वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाच्यावतीने निषेध…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES