कणकवली पत्रकार संघाची पोलीस निरीक्षकांकडे मागणी;चौकशी करण्याचे दिले आश्वासन..
कणकवली,ता.१०: कळसुळी येथील पत्रकार विराज गोसावी यांच्या कुटुंबायांनी केलेल्या शेतीचे अज्ञात लोकांनी केलेल्या नुकसान केले आहे.त्यात झेंडू,४० किलो हळद व अन्य शेतीचे नुकसान झाले आहे.या संदर्भात पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांची भेट घेऊन जे अज्ञात आरोपी आहेत,त्याच्या विरोधात कारवाई करा,अशी मागणी लेखी पत्राद्वारे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे केली.
त्यावर घटनास्थळी अधिकारी पाठवून चौकशी करतो,जे कोणी हे कृत्य केले ते निंदनीय आहे.त्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल करतो,असे आश्वासन दिले.
यावेळी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके ,माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत भावे , पत्रकार चंद्रशेखर देसाई , चंद्रशेखर तांबट,अजित सावंत,विवेक ताम्हणकर , राजन चव्हाण , उमेश परब , ओंकार ढवण, विराज गोसावी , संजय पेटकर , आनंद तांबे आदी पत्रकार उपस्थित होते .