राजेश टोपे; धार्मिक स्थळे,व्यायामशाळाही उघडण्याचे संकेत…
मुंबई,ता.१०: नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्र अनलॉक करू,व्यायामशाळा व धार्मिक स्थळे उघडू,असे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिले आहेत.दरम्यान कोरोना चाचणी आठशे रुपयांपर्यंत करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.त्या दृष्टीने विचारविनिमय सुरू आहेत.सर्वसामान्यांना चाचणी परवडण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अनलॉकच्या पार्श्वभूमीवर श्री.टोपे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.धार्मिक स्थळे,व्यायाम शाळा उघडण्यात याव्यात,अशी मागणी गेले काही दिवस सुरू आहे.या पार्श्वभूमीवर श्री.टोपे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.