बांदा,ता.१०: ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस यांच्यामार्फत विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. शुक्रवारी २७ तर आज १० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दोन आठवड्यापासून आतापर्यंत एकूण १६३ जणांवर प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे.
शनिवारी दिवसभरात पोलीस, होमगार्ड आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मिळून विनामास्क फिरणाऱ्या एकूण १० जणांवर प्रत्येकी १०० प्रमाणे १ हजार रुपये दंड आकारण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाई मुळे मास्कबाबतीत शहरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी मास्क वापरून लोकांनी सहकार्य करण्याचे तसेच हे सर्व निर्णय आपल्या आरोग्यासाठी घेण्यात आले असून सर्वांनी नियमांचे पालन करा असे आवाहन यावेळी केले.
बांद्यात विना मास्क फिरणाऱ्या १६३ जणांना पोलिसांचा दणका…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES