चालकात संभ्रम; दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांचा निर्णय…
बांदा,ता.१०:बांदा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या तुळसान पुला जवळील असलेल्या चेकपोस्ट वर शुक्रवारी रात्री पासून वाहनांची कडक तपासणि करतांना दिसून आली, अचानक वाहनाची कसून तापसणि सुरू झाल्याने वाहन चालक संभ्रमात पडताना दिसून आले.
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर रित्या वाहतूक महाराष्ट्र राज्यात काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात होताना आढळून आल्या आहेत, बांदा शहर हे गोवा राज्याच्या सीमेलगत असल्याने दारुवाहतुकी साठी जवळ असलेला मुख्य मार्ग मानला जातो, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या क्लुप्त्या वापरून वाहनांतून दारू वाहतुक केली जाते त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री पासून बांदा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी इन्सुलि चेकपोस्ट वर येणारे ट्रक, चारचाकी तसेच बॅग घेऊन असलेल्या दुचाकी वाहनांची नेहमीपेक्षा अजून कसून तापसणी करण्यास सुरवात केली. वाहनाची कसून तपासणी अचानक अजून कडक केल्याने वाहनचालक ही संभ्रमात पडताना यावेळी दिसून आले.