Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावैभववाडी नगरपंचायतीची नाहक बदनामी खपवून घेणार नाही...

वैभववाडी नगरपंचायतीची नाहक बदनामी खपवून घेणार नाही…

नगराध्यक्षा समिता कुडाळकर; शिवसेना नेते सतीश सावंत यांना दिला इशारा…

वैभववाडी,ता.१०:मागील साडेचार वर्षात कोणतेही चुकीचे काम न. पं. मध्ये झालेले नाही. आ. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाभवे – वैभववाडी न.पं. चा कारभार लोकाभिमुख व पारदर्शक पणे चालू आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे सतीश सावंत यांनी न.पं. ला नाहक बदनाम करू नये. यापुढे न.प. वरील टीका खपून घेणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा वैभववाडीच्या नगराध्यक्षा सौ समिता कुडाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शुक्रवारी वैभववाडी नगरपंचायत सत्ताधाऱ्यांचे कुरण बनले आहे. न.प. मधील अनेक तक्रारींचा पर्दाफाश करणार असल्याची टीका पत्रकारांशी बोलताना केली होती.
न.पं.च्या विकास कामांची टेंडर ही नियमाप्रमाणे होतात. ऑनलाईन पद्धतीने निविदा मागविण्यात येतात. कमी दराच्या निविदेला कामे दिली जातात. तरीही याविषयी नागरिकांची दिशाभूल आपण करत आहात. आपल्याला आदरणीय नारायण राणे साहेबांनी अनेक पदांवर संधी दिली आहे. सद्यस्थितीत बँक सोडली तर आपल्याकडे दुसरे व्यासपीठ नाही. या व्यासपीठावरुन उगाच उठाठेवी करत बसू नये. असे सौ. कुडाळकर यांनी पत्रकात म्हटले आहे. न.पं. मध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही. कोरोना संकटात न.प. ने जबाबदारीने काम केले आहे. इतर शहरांच्या तुलनेत वैभववाडीत कोरना रुग्ण कमी आढळले आहेत. हे न.प.चे यश आहे. सद्यस्थितीत शहर कोरोनामुक्त आहे हे सर्व नगरसेवक, प्रशासन व नागरिक यांचे यश असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. यावेळी कधी चांगले बोलला नाही. निवडणूक तोंडावर ठेवून न घडलेल्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा राणे साहेबांनी दिलेल्या पदाचा उपयोग लोकांसाठी करावा असे पत्रकात समिता कुडाळकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान शनिवारी न.पं. मध्ये नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, बांधकाम सभापती संतोष पवार, आरोग्य सभापती सुचित्रा कदम, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष दीपा गजोबार, नगरसेविका शोभा लसणे, नगरसेवक रवींद्र तांबे, संजय सावंत, संपदा राणे आदी उपस्थित होते.

फोटो – समिता कुडाळकर.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments