नगराध्यक्ष, बांधकाम सभापतींच्या प्रसंगावधनामुळे अनर्थ टळला ; वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू…
मालवण, ता. १० : शहरातील पालिकेच्या समोरील वझे दवाखान्यानजीक मुख्य वीज वहिनी तुटून पडल्याची घटना काही वेळापूर्वी घडली. हा प्रकार लक्षात येताच प्रसंगावधान राखत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत यांनी घटनास्थळी धाव घेत मार्गावरील रहदारी रोखली. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती. महावितरण कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधत वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून तो पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
आज रात्री अचानक पालिकेच्या समोरील वझे दवाखान्यानजीकच मुख्य वीज वहिनी अचानक तुटून पडली. वहिनी पडताच आगीच्या मोठ्या ठिणग्या उडू लागल्या. हा प्रकार नगराध्यक्ष कांदळकर, श्री. खोत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना सावध केले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून वीज पुरवठा खंडित करण्यात आला. मुख्य वीजवाहिनीच तुटून पडल्याने आगीच्या ठिणग्या उडताना दिसत होत्या. महावितरणच्या पथकास पाचारण करून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू
होते.