मालवण, ता ११ : बामसेफ, डीएस फोर, बहुजन समाज पार्टीचे संस्थापक, बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त बहुजन समाजपार्टीच्या वतीने मालवण येथे विनम्र अभिवादन सभा पार पडली.
यावेळी बसपाचे जिल्हा कोषाध्यक्ष नरेंद्र पेंडुरकर, माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर माणगांवकर, जिल्हा महासचिव विजय साळकर, फुले, शाहू आंबेडकर विचार मंच मालवणचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सिद्धार्थ जाधव, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे हरेष चव्हाण, विजय जाधव, मालवणी बझार सहकारी संस्थेचे संचालक सोनवडेकर, आंनद मालवणकर, बबन मालवणकर, बाळा कोळंबकर आणि सर्व बामसेफ संयोजक उपस्थित होते.