पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान
वैभववाडी/पंकज मोरे,ता.११: सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार फटकेबाजी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले भात पीकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत बहरलेले पीक भिजल्याने शेतकऱ्यांसमोर आता नुकसानीचे संकट उभे राहिले आहे.
अॉक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस अजून गेलेला नाही. परतीचा पाऊस अजूनही पडत असल्याने सिंधुदुर्गकर पाऊस कधी जाणार या विवंचनेत आहेत. चांगला पाऊस पडल्याने भात पीकही बहरून आले. मात्र सततच्या पावसामुळे भात शेतीचे नुकसान होत आहे.
जिल्ह्यात काही भागात कापणी सुरू झाली आहे. मात्र पावसामुळे भात पीक चांगले येवूनही शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी चार महिने केलेली शेतीची मेहनत चांगली फळाला आली होती. मात्र सततच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.