सावंतवाडी,ता.११: आंबोली घाटात महिलेचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघाही संशयितांना आज येथील न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गेले नऊ दिवस हे पोलीस कोठडीत होते.त्यांच्या कडून तपासाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आज पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
मळगाव येथील एका महिलेचा खून त्यांनी अनैतिक संबंधातुन खुन केला होता. तसेच पुरावा नष्ट करण्याचे काम केले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात तब्बल ५ संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यातील दोघे जण अल्पवयीन आहे. आज तिघांची पोलिस कोठडीची मुदत संपली.त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
महिलेचा खून केल्याप्रकरणी संशयितांना न्यायालयीन कोठडी…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES