बांदा,ता.११: श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई संचलित येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेत महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून ऑनलाईन वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा इयत्ता आठवी ते दहावी या गटासाठी आयोजित केली गेली होती. वक्तृत्व स्पर्धेसाठी महात्मा गांधीजींचे जीवन कार्य हा विषय देण्यात आलेला होता .सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम- कुमारी तन्वी बांदेकर, द्वितीय- युती राऊळ, तृतीय- (विभागून)- शर्वणी गायतोंडे, लिशा नाटेकर. स्पर्धेचे परीक्षण प्रशालेच्या शिक्षिका शिल्पा कोरगावकर, रसिका वाटवे यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष मंगेश कामत, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा अमृता महाजन, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ,पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES