बांदा,ता.११: मडुरा दशक्रोशीसह सावंतवाडी तालुक्यात शनिवारी रात्रो परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून कापणीयोग्य झालेले भातपीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही ठिकाणी कापणी करून ठेवलेले पीक पावसात भीजल्यामुळे कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे बळीराजा चिंतेत आहे.
प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळणार असेल तरच पंचनामा करावा, अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना कोणीही वाली नसल्याच्या संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. ऑक्टोबर महिना अर्ध्यावर आला तरी पाऊस अजून गेलेला नाही. मडुरा, शेर्ले, इन्सुली, निगुडे, रोणापाल, पाडलोस, कास, सातोसे, न्हावेली, दांडेली, सातार्डा, साटेली, मळेवाड भागातील भातशेती कापणीयोग्य झाली असून परतीचा पाऊस जाण्याची शेतकरी वाट पाहत आहे. सावंतवाडी तालुक्यात काही शेतकऱ्यांनी कापणीस सुरूवातही केली असून गेले दोन दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसाने मात्र बळीराजाची तारांबळ उडाळी आहे.
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने नुकसानीस सामोरे जावे लागणार या विवंचनेत शेतकरी आहे. पावसाने पीक भिजले असल्याने भाताचा आतील दाणा ओला झाला आहे. त्यामुळे चांगले पीक येऊनही शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे.
मडुरा दशक्रोशीत झालेल्या परतीच्या पावसाने भातपीकाचे नुकसान…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES