मालवण, ता. ११ : एएसडी-८६ सोशल फाउंडेशन आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने आज घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४४ जणांनी रक्तदान केले.
धुरीवाडा संस्कार हॉल येथे घेण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते ढोले बाबू यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी हरी चव्हाण, सीमसन फर्नांडीस, किशोर नाचणोलकर, दत्ता तांडेल, सुरेंद्र सकपाळ, संभाजी आचरेकर, अजय वझे, नाना परब, गुरुनाथ माने, अमेय देसाई, स्मृती कांदळगावकर, अनिता केळुसकर, पंढरी मालंडकर, विजय भोजने, रिझवान शेख, भाई सारंग, रवि शिरपुटे, नितिन केरकर, हेमंत वंजारी, राजेश कुशे, संजय करलकर, सुहास खराडे, सुषमा खराडे, रक्त संक्रमण अधीकारी डॉ. बागवान, अनिल खाडे, अधिपरिचारीका श्रीमती बागेवाडी, श्रीमती रेडकर आदी उपस्थित होते. शिबिरात ४४ जणांनी रक्तदान केले.