Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामल्टीस्पेशालिटी आणि शासकीय रुग्णालयाची घोषणा मृगजळच ठरणार...

मल्टीस्पेशालिटी आणि शासकीय रुग्णालयाची घोषणा मृगजळच ठरणार…

परशुराम उपरकर; सत्ताधार्‍यांनी आरोग्य यंत्रणा खिळखिळी केल्याचा आरोप…

सावंतवाडी,ता.१२: जिल्ह्यात शासकीय रुग्णालय आणि सावंतवाडीत मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल अशा प्रकारे सत्ताधार्‍यांची सुरू असलेली घोषणा ही जिल्हावासीयांसाठी मृगजळच ठरणारी आहे. आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी कोरोनाच्या काळात आवश्यक असलेली सेवा हे देवू शकत नाही,मग ही आश्वासने कशी पुर्ण करणार?, असा ही सवाल श्री उपरकर यांनी व्यक्त केला. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते .
यावेळी उपरकर म्हणाले,जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पुर्णतः ढासळलेली आहे. अशा परिस्थितीत मनसेच्या माध्यमातून विविध आंदोलन करून ती पुर्ववत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आली, ही वस्तूस्थिती आहे. मात्र सत्ताधारी या ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाईल,असे सांगुन येथील लोकांची धुळफेक करीत आहेत. परीषदेत ते बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपाध्यक्ष दत्ताराम गावकर, तालुकाध्यक्ष गुरूदास गवंंडे, शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, अनिल केसरकर, बनी नाडकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी श्री उपरकर म्हणाले,या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक सक्षम नसल्यामुळे आम्ही विरोधकांचे काम योग्य पध्दतीने सुरू केले आहे. त्यामुळे येथील जनता मनसे आणि पर्यायाने राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी आमची आंदोलने असतील,असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या, अशी मागणी आपण करणार आहे. त्यासाठी उद्यापासून जिल्हाभरात आंदोलन करण्यात येणार आहे.असे उपरकर म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments