Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या...ज्यांना २५ वर्षात सभागृहात काय बोलावे हे कळत नाही त्यांना बोलण्याचा नैतिक...

…ज्यांना २५ वर्षात सभागृहात काय बोलावे हे कळत नाही त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही…

शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांची पं. स. सदस्य अरविंद रावराणे यांच्यावर प्रसिद्धी पत्रकाव्दारे टीका

वैभववाडी/पंकज मोरे,ता.१२:  ज्यांना २५ वर्षात सभागृहात काय बोलावे हे कळत नाही त्यांना अडीच वर्षाच्या सभापती पदाचा अनुभव असलेल्या लक्ष्मण रावराणे यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. उगाचच वरिष्ठांना खूश करण्यासाठी टीका करावी हे हास्यास्पद आहे. पं. स. सदस्य अरविंद रावराणे यांनी गेल्या २५ वर्षात लोकांचे किती प्रश्न सोडविले व त्यांना किती सभाशास्त्र कळते हे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. अशी टीका वैभववाडी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे.
पं. स. सदस्य अरविंद रावराणे यांनी माजी सभापती लक्ष्मण रावराणे यांना ‘शुद्ध मराठी भाषा’ बोलता येत नसल्याची टीका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली होती. यावर रावराणे यांच्या टीकेला वैभववाडी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, गेली २५ वर्षे अरविंद रावराणे हे पं. स. सभागृहात आहेत. त्यांनी लक्ष्मण रावराणे यांच्यावर टीका केली की, त्यांना धड मराठी शुद्ध भाषा बोलता येत नाही किंवा त्यांना कुठला ठराव मांडता येत नाही. व त्यांनी जनतेचे किती प्रश्न सोडविले असे प्रसिद्धी पत्रकातून सांगितले होते.
अरविंद रावराणे यांनी २५ वर्षात लोकांचे किती प्रश्न सोडविले व त्यांना किती सभाशास्त्र कळते हे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. आपले आमदार दोनवेळा निवडून आले म्हणून सांगता ते जसे आपल्या कामाने निवडून आलेत तसेच लक्ष्मण रावराणे यांनी सुध्दा जनतेचे प्रश्न सोडविले आहेत. म्हणूनच त्यांना जनतेने निवडून दिले. व ‘देव तेका बघून घेत’ म्हणून बोलणा-या लक्ष्मण रावराणे यांना सभापती पद मिळाले. कारण त्यांची देवावर खूप श्रद्धा आहे. कारण या जगात जे काही चांगले वाईट घडते त्याचा कर्ता करविता तोच आहे.
लक्ष्मण रावराणे यांच्या सभापती पदाच्या कारकीर्दीत सभापती दालनामध्ये गोरगरीब जनतेलाच न्याय दिला जात होता. ते सर्वसामान्यांचे सभापती आहेत. असे सर्वांना वाटायचे. त्यांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेलाच प्राधान्य दिले म्हणूनच त्यांच्या कारकीर्दीत प्रथमच तालुक्याचा एक सभापती संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्येक गावात जावून पाणी टंचाईचे प्रस्ताव तयार करून मंजूर करून घेतले. व लोकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. हे सुध्दा आपल्याला माहिती आहे. उगाचच वरिष्ठांना खूश करण्यासाठी टीका करावी हे हास्यास्पद आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments