आरोंदा सोसायटी पदाधिकार्यांचे स्पष्टीकरण; संस्थेची नाहक बदनामी नको…
सावंतवाडी ता.१२:
आरोंदा सोसायटीचा कारभार पारदर्शक आहे.त्यामुळे सुर्यकांत नाईक व त्यांच्या सहकार्यांनी खुशाल घंटानाद आंदोलन करावे,आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.असा टोला संस्थेचे अध्यक्ष बबन उर्फ रधुनाथ नाईक व अन्य सदस्यांनी दिला आहे.दरम्यान सेल्समनच्या नजरचुकीमुळे जी चुक झाली होती,ती चुक सचिवांच्या लक्षात आल्यानंतर संबधितांवर कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे नाहक कोणी संस्थेची बदनामी करू नये,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आरोंदा सोसायटीत अपहार झाल्याचा आरोप करीत तेथिल ग्रामस्थ सुर्यकांत नाईक यांनी १९ तारखेला घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या पार्श्वभूमिवर सोसायटीच्या पदाधिकार्यांनी आज ब्रेकींग मालवणीच्या कार्यालयात संपर्क साधून आपली बाजू दिली.
ते म्हणाले,या ठीकाणी कोणताही अपहार झालेला नाही.संस्थेचे काम चांगले आहे.त्या बदद्दल आम्हाला खुद्द ऑडीटर कडुन चांगला रिपोर्ट दिला आहे.असे असताना गावातील आणि देवस्थानातील काही राग मनात ठेवून सुर्यकांत नाईक यांच्यासह गुरूनाथ पडते व त्यांचे अन्य सहकारी सोसायटीला नाहक बदनाम करण्याचे काम करीत आहेत.मात्र त्यांनी केलेले आरोप धांदात खोटे आहेत.कोणत्याही प्रकारचा अपहार याठीकाणी झालेला नाही.उलट नजरचुकीने जो प्रकार सेल्समन कडुन घडला होता.तो लक्षात आल्यानंंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.त्यामुळे त्यांचे आरोप हे अत्यंत खोटे आहेत.त्यात पदाधिकार्यांनी असे म्हटले आहे की, आमच्या रेशन दुकानात धान्य पुरवठा सुरळीत केला जात आहे. त्या ठीकाणी महसुल व पुरवठा विभागाकडुन नियमीत तपासणी केली जाते. त्यामुळे त्या ठीकाणी अपहार झाला असे म्हणणे योग्य ठरणार नाही. तर दुसरीकडे कर्ज माफी ज्या शेतकर्यांना मंजूर करण्यात आली, त्यांना त्याचा लाभ देण्यात आला आहे. अपात्र लाभार्थ्याना आम्ही कसा काय लाभ देवू शकतो,असाही प्रश्न त्यांनी केला असून केवळ सोसायटी आणी पदाधिकार्यांना बदनाम करण्यासाठी काही लोकांकडुन हा प्रकार सुरू आहे. मात्र त्यांच्या सोबत संस्थेचा सभासद कींवा ग्रामस्थ नाहीत. ही वस्तूस्थिती आहे.असे त्यांनी सांगितले.
यावेळी वासुदेव उर्फ प्रकाश नाईक,अनंत नाईक,ज्ञानदेव नाईक,गजानन कोरगावकर,अरुण पोळजी,माधुरी कोरेकर,सुहास गावडे,भिवनाथ गोसावी,गंगाधर होडावडेकर,मनोहर शेटकर,दीपाली नाईक आदी उपस्थित होते.