Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादोडामार्गात उभी राहणार ''माणुसकीची भिंत''...

दोडामार्गात उभी राहणार ”माणुसकीची भिंत”…

माजी नगराध्यक्षांचा पुढाकार; गोरगरिबांना फायदा होईल,संतोष नानचे…

दोडामार्ग,ता.१२: शहरात आज ”माणुसकीची भिंत” या उपक्रमाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्या हस्ते करण्यात आला.हा उपक्रम पिंपळेश्वर सभागृहात करण्यात आला आहे.आपल्या हातून एखाद्या गोरगरिबाला मदत व्हावी,व या वस्तू कोणीतरी गरीब वापरात आणू शकतो.या भावनेतून हा उपक्रम संतोष नानचे यांच्या मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. दरम्यान आज शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
या दालनात कपडे, घरातील वापरायच्या वस्तू व अन्य जीवनावश्यक साहित्य ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या वस्तूंचा गोरगरिबांना चांगला फायदा होऊ शकतो. संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जाणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी सरपंच पांडुरंग बोर्डेकर,केशव रेडकर,प्रकाश काळबेकर,नितीन मणेरीकर, समीर गार्डी, संदेश गवस,आनंद ताटे,सागर चांदेलकर,रजत राणे, बाळा कोरगावकर,दादा बोर्डेकर, गोपाळ गावडे,भिकाजी गावडे, रामदास बागकर,नारायण दळवी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments