कौस्तुभ गावडे; एनएसयुआयकडून जिल्ह्यातील तंत्रशिक्षण संस्थेला इशारा…
सावंतवाडी,ता.१२: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात सर्व परीक्षा ऑनलाईन होत आहेत.मात्र जिल्ह्यातील एका होकेशनल ट्रेनिंग सेंटरने विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान याला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज एन.एस.यू.आय.जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे यांनी संबंधित संस्थेची भेट घेऊन परीक्षा ऑनलाईनच घ्या,अशी मागणी केली.तसेच एन एस यू आय या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून त्यांना न्याय मिळवून देईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी एन एस यू आय चे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष प्रणव गावडे, सावंतवाडी तालुका सरचिटणीस इंद्रनील अनगोळकर, सरचिटणीस दीपक पिरनकर, पदाधिकारी विशाल राऊत, हर्ष कोचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.