संजू परब; मंदिरे उघडण्याबाबत सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन…
सावंतवाडी ता.१२: ठाकरे सरकारकडून मंदिराचे दरवाजे उघडण्यास नकार देण्यात आल्यामुळे उद्या भाजपच्यावतीने जिल्हाभरात घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर सकाळी दहा वाजता येथील श्री देव विठ्ठल मंदिरा समोर घंटानाद आंदोलन केले जाईल,अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिली.नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांचा सत्कार सोहळा आज येथे झाला.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री.परब यांनी याबाबतची माहिती दिली.
ते म्हणाले, उद्या चे आंदोलन श्री.गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे व मंदिर उघडण्यासाठी प्रयत्न करावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.