वेंगुर्ला,ता.१२: गेले दोन दिवस पडलेल्या परतीच्या पावसाने वेंगुर्ला तालुक्यासह शहरातील शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे.
कापणीयोग्य झालेले आणि हातातोंडाशी आलेले भात वाया गेल्याने शेतक-यांमध्ये चितेचे वातावरण दिसत आहे.
वेंगुर्ला तालुक्यात ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या लखलखाटासह परतीचा पाऊस बरसला आहे. शनिवारी आणि रविवारी पडलेल्या पावसाने शेतीमध्ये पाणीच पाणी केले आहे. मध्यंतरीच्या पावसानंतर शेतीमध्ये भातकापणीला सुरुवात झाली होती. परंतु दोन दिवस कोसळलेल्या परतीच्या पावसाने भातपिकाचे नुकसान केले आहे.आजही तुरळक पाऊस सुरू असून काही ठिकाणी कापलेले भातपिक पावसामुळे भिजल्याने वाया गेले आहे.
शेतात परतीच्या पावसाचे पाणी साचल्याने भातपिकाचे नुकसान…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES