सावंतवाडी पोलिसात परस्परविरोधी तक्रार; दोघे जखमी…
सावंतवाडी ता.१२: जमिनीच्या मालकी हक्कावरून आंबेगाव येथे दोन गटात झालेल्या जोरदार हाणामारीत दोघे जण जखमी झाले.दरम्यान याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.तर जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की,आंबेगाव येथे जमिनीच्या मालकी हक्कावरून वरक व नाईक कुटुंबियात जोरदार हाणामारी झाली.दरम्यान या प्रकरणी सुर्यकांत नाईक व नीता विठू वरक या दोघांनीही परस्पर विरोधी फिर्याद पोलीस ठाण्यात दिली आहे.
सुर्यकांत नाईक यांनी जमीन मोजणीसाठी खाजगी सर्वेअर आणला होता.त्याने जमिनीची मोजणी केली असता,सदरची मोजणी वरक कुटुंबियांना मान्य झाली नाही.त्या दरम्यान या दोहोंत शाब्दिक बाचाबाची झाली.या शाब्दिक भांडणाचे रूपांतर मारहाणीत होऊन सुर्यकांत नाईक याने विठू वरक यांच्या डोक्यावर दांडा मारून रक्तबंबाळ केले.तर नवऱ्याला मारहाण केल्याचे बघून नीता वरक हिने सुर्यकांत नाईक यांच्यावर दगड उगारून त्यांना जखमी केले.दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर सोडण्यात आले.तर या प्रकरणी वरक व नाईक कुटुंबीयांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली आहे.