राजू शेट्टी; वेंगुर्लेतील फळ बागायतदारांना भेटी दरम्यान दिले आश्वासन
वेंगुर्ले
आंबा कॅनिंगचा दर किमान चाळीस रुपया पर्यत असावा या अनुषंगाने कॅनिंग फॅक्टरी व आंबा बागायतदारांची चर्चा घडवून आणण्यात येणार आहे असे आश्वासन माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे शेतकऱ्यांना दिली.
श्री शेट्टी यांनी आज वेंगुर्ले येथिल फळ संशोधन केंद्रास भेट दिली त्यानंतर नीलेश चमणकर यांच्या निवासस्थानी त्यांनी शेतकऱ्यांची व बागायतदार यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी आंबा काजू बागायतदार शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, निवृत्ती नाईक, नीलेश चमणकर,संजय गावडे, सोमेश्वर गोलगिरे, गणेश महाजन,श्वेता चमणकर आदी उपस्थित होते.
यावेळी शेट्टी यांनी शेतकरी व बागायतदारांची चर्चा केली यावेळी येथील शेतकऱ्यांच्या आंबा काजू उत्पादनांना ांगले मार्केट मिळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यासाठी आपण निश्चितच पाठपुरावा करू असे त्यांनी आश्वासन दिले