Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
उदय सामंत; राजकारणापलीकडे जाऊन, एकत्र येऊन विकास कामे करूया…
वेंगुर्ले,ता.१२: आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ल्यात मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. त्यामुळे तो निधी योग्य पद्धतीने खर्च होणे गरजेचे आहे. त्यासाठी राजकारणापलीकडे जाऊन विकास कामे करूया,असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. दरम्यान नित्कृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी झाली पाहिजे, ज्या कामाबाबत तक्रारी आहेत त्या कामांची चौकशी मुख्याधिकार्यांनी करून याबाबतचा अहवाल आपल्याला तात्काळ सादर करावा. वेंगुर्ला मच्छी मार्केटचे कामे जानेवारीपर्यंत पूर्ण झाले पाहिजे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.पालकमंत्री सामंत यांच्या समवेत नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.