Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामंदिरे उघडण्यासाठी सावंतवाडीत भाजपाचा "घंटानाद"...

मंदिरे उघडण्यासाठी सावंतवाडीत भाजपाचा “घंटानाद”…

दार उघड उद्धवा, दार उघड; राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी…

सावंतवाडी,ता.१३: कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेली मंदिरे उघडण्यात यावी,यासाठी येथील भाजपाच्या माध्यमातून येथील विठ्ठल मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात करत “दार उघड उद्धवा,दार उघड” असे आवाहन करण्यात आले. शहराध्यक्ष अजय गोंदावले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, दीपाली भालेकर, अजय सावंत, अमित परब, मोहिनी मडगावकर, केतन आजगावकर,गुरू मठकर,गणेश कुडव आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments