Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याशिरोडा-वेळागरात जखमी युरेशियन चीमनमार ससाणा पक्षाला जीवदान...

शिरोडा-वेळागरात जखमी युरेशियन चीमनमार ससाणा पक्षाला जीवदान…

पक्षीमित्रांचा पुढाकार; प्राथमिक औषधोपचार करून नैसर्गिक अधिवास सोडले


शिरोडा वेळागार येथे आज सकाळी युरेशियन चिमनमार ससाणा हा पक्षी माश्याच्या जाळ्यात अडकल्याने गळ्याला फास लागून जखमी झाला होता. त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करून पक्षीमित्रांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.
शिरोडा येथील पक्षीमित्र सुरज आमरे, ग्रामपंचायत सदस्य आजू आमरे तसेच आनंद आमरे, आबा चिपकर, गौरीज आमरे, स्वप्नेश भगत, समीर भगत आणि राजन रेडकर यांनी त्या युरेशियन चिमनमार ससाणा या पक्षाला जाळ्यातून जखमी अवस्थेत बाहेर काढून प्राथमिक उपचार करून जीवनदान दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments