प्रकाश राणे ; कुठल्या विभागात वेतन प्रक्रियेस विलंब होतो याची माहिती द्या…
ओरोस,ता.१३:
ऑक्टोबर महिन्याची १३ तारीख आली तरी जिल्ह्यातील सेवानिवृत्त ग्राम सेवक संवर्गाचे निवृत्ती वेतन मिळालेले नाही. प्रत्येक महिन्याच्या १ ते ३ तारीख पर्यंत हे वेतन मिळावे यासाठी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. तरीही वेळेत वेतन दिले जात नाही. शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यात ३ तारीख पर्यंत वेतन जमा झालेले आहे. तसेच नेहमी वेतन याच कालावधीत जमा होते. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेमका वेळ कुठे लागतो हे समजत नाही. ज्या विभागात वेतन प्रक्रियेला वेळ लागतो. त्याची माहिती २५ ऑक्टोबर पर्यंत आम्हाला द्यावी. अन्यथा आम्हाला नाइलाजास्तव जिल्हा परिषद समोर लाक्षणिक उपोषण छेडावे लागेल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामसेविका ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी अध्यक्ष प्रकाश राणे, उपाध्यक्ष हनुमंत प्रभू, बाबली वायंगणकर, आर एस घाडीगांवकर, विठ्ठल वाटवे, मनोहर पडते, राजाराम जाधव आदी उपस्थित होते.