वैभववाडी पंचायत समितीचे आयोजन ; आमदार नितेश राणे यांची उपस्थिती….
वैभववाडी,ता.१३:
वैभववाडी पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी ठिक ३ वा. ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उंबर्डे हायस्कूल सभागृहात हा मेळावा पार पडणार आहे. या प्रसंगी कणकवली, देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तसेच जि.प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, डॉ. डी.वाय.पाटील साखर कारखाना संचालक प्रभाकर तावडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील, खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जि.प. माजी उपाध्यक्ष नासीर काझी, माजी उपसभापती भालचंद्र साठे आदी उपस्थित राहणार आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणे, ऊस लागवड क्षेत्र वाढीस प्रोत्साहन देणे, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन सभापती सौ. अक्षता डाफळे यांनी केले आहे.