कुडाळ,ता.१३: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एकीकडे बार उघडे ठेवण्यास परवानगी दिली आहे.तर दुसरीकडे मंदिरे मात्र बंदच आहेत.त्यामुळे राज्य सरकारच्या निषेधार्थ आज येथील भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन छेडण्यात आले.यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.तसेच सर्व मंदिरे उघडण्यात यावीत,या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदनही दिले.
यावेळी तालुका अध्यक्ष विनायक राणे,महिला जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष दिपक नारकर,तालुका सरचिटणीस विजय कांबळी,जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत,दीप्ती पडते, मोहन सावंत, अजय आकेरकर, योगेश बेळणेकर, नगरसेवक सुनील बांदेकर, दिनेश शिंदे, चेतन धुरी, राकेश कांदे,ममता धुरी,राकेश नेमळेकर,चेतन धुरी,पप्या तवटे, विजय माळकर, निलेश तेंडुलकर, आदी कुडाळ तालुक्यातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिरे उघडण्यासाठी भाजपाचे कुडाळात घंटानाद आंदोलन…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES