Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्ला तालुक्यात ७ जण कोरोना पॉझिटिव्ह

वेंगुर्ला तालुक्यात ७ जण कोरोना पॉझिटिव्ह

वेंगुर्ला,,ता.१३: 
वेंगुर्ला तालुक्यात दोन दिवसात आलेल्या रिपोर्ट नुसार एकूण ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.अशी माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली.
वेंगुर्ला शहरात सुदैवाने एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. दरम्यान काल सोमवारी शिरोडा येथे १ तर आज मंगळवारी खानोली येथे ५ आणि मातोंड येथे १ असे एकूण सात जण पॉझिटिव्ह सापडले.
दरम्यान तालुक्यात आतापर्यंत ४०० रुग्ण सापडले असून त्यातील ३४५ रूग्ण बरे झालेले आहेत. तसेच ९ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ४६ जण उपचाराखाली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments