Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यापालकमंत्र्यांना आता सांस्कृतिक मंत्री करा,मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी...

पालकमंत्र्यांना आता सांस्कृतिक मंत्री करा,मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी…

नितेश राणे; ते जिल्ह्यात कलाकारासारखे येतात आणि डायलॉग मारतात…

सिंधुदुर्गनगरी,ता.१३:
पालकमंत्री उदय सामंत यांची नाट्य क्षेत्राशी जवळीक आहे. त्याप्रमाणे ते जिल्ह्यात नाटक कंपनी किंवा एखाद्या कलाकारा प्रमाणे जिल्ह्यात येतात. डायलॉग मारतात. टाळ्या मिळवितात आणि निघुन जातात. त्यामुळे त्यांना सांस्कृतिक मंत्री करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत, असे आ नितेश राणे यानी पत्रकार परिषदेत सांगितले.
आ राणे यांनी आज जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची भेट घेत अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या भात शेतीचे तात्काळ शासकीय पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशाप्रकारचे निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात येत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत कुडाळ माजी नगराध्यक्ष विनायक राणे, बंड्या नारकर, प्रितेश गुरव, योगेश घाडी आदी उपस्थित होते.
कोरोना उपायासाठी आम्ही कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तीचे एन्टी बॉडीज टेस्ट करण्याची मागणी केली होती. यांच्या बैठकांना जिल्हा परिषद अध्यक्षाना निमंत्रण दिले जात नाही. कोणाचा कोणाला निर्बंध नाही. व्हीसी घेतल्या जातात. त्याचा काय उपयोग झाला ? असे जिल्हाधिकारी यांना विचारले असता त्या उत्तर देवू शकले नाही. आमच्या जिल्ह्याची स्थिती सरकारकडे पोहोचली पाहिजे. यासाठी सर्वपक्षीय बैठक घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे ऑनलाईन बैठक तरी घ्या. त्यात सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करा, असे आवाहन आ राणे यानी यावेळी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments