Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्लेत श्री.रामेश्वर देवाच्या समोर भजन करत अनोख्या पद्धतीने आंदोलन....

वेंगुर्लेत श्री.रामेश्वर देवाच्या समोर भजन करत अनोख्या पद्धतीने आंदोलन….

मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक

वेंगुर्ला,,ता.१३: 
उध्दवा ……. धुंद तुझे सरकार..अशा घोषणा देत मंदिरे खुली करा या मागणीसाठी वेंगुर्ला येथे भाजपच्या वतीने ग्रामदेवता श्री.रामेश्वर देवाच्या समोर भजन करत अनोख्या पद्धतीने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील अनेक धार्मिक संघटना, देवस्थान समित्या आणि प्रदेश भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने राज्यातील मंदीरे दर्शनासाठी खुली करावी या मागणीसाठी राज्यव्यापी उपोषण आज करण्यात आले. अनलाॅकच्या पहील्या , दुसऱ्या, तीसऱ्या टप्प्यात लाॅकडाऊन काळात ” लाॅक ” असलेल्या राज्यातील अनेक बाबी सरकारने काही नियम अटीसह ” अनलाॅक” केल्या. यात सेवा क्षेत्रातील अनेक उद्योगासोबत दारुची दुकाने सुध्दा खुली करण्यात आली. परंतु जनतेची मागणी असुनही बंद असलेली मंदीरे दर्शनासाठी खुली करण्यात आलेली नाहीत.
महाराष्ट्र वगळता देशभरातील सर्व मंदीरे दर्शनासाठी उघडण्यात आली. परंतु हिंदू द्वेशी आघाडी सरकार जाणीवपूर्वक जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. या तीघाडी सरकारकडून संधी मिळेल तेव्हा हिंदूत्व विषयाची गळचेपी करण्याचे कारनामे सुरु आहेत.
राज्यातील जनतेची श्रद्धास्थानं असलेली सर्व मंदीरे कोवीड नियमावलीच्या अटी शर्थीसह खुली करण्यात यावी, ही मागणी सरकार पर्यंत पोहोचण्यासाठी वेंगुर्लेत ग्रामदेवतेच्या समोर सरकारच्या विरोधात लाक्षणिक उपोषण व भजन म्हणून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांसह देवस्थान ट्रस्टी, मानकरी, पुजारी, पुरोहित तसेच मंदिरावर उपजीविका करणारे फुल व प्रसाद विक्रेते, वारकरी संप्रदायाचे भावीक उस्फूर्त पणे सहभागी झाले होते.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, साईप्रसाद नाईक, मच्छिमार नेते वसंत तांडेल, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, माजी उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर व शेखर कोयंडे, रामेश्वर देवस्थान ट्रस्टी रविंद्र परब, दाजी परब, प्रथम मानकरी सुनील परब, परबवाडा सरपंच पपु परब, सोमनाथ टोमके, ता.उपाध्यक्ष दिपक नाईक, शैलेश जामदार, विजय गुरव, नगरसेवक प्रशांत आपटे, ता.चिटनीस समीर चिंदरकर, आडेली शक्ती केंद्र प्रमुख तात्या कोंडसकर, वायंगणी उपसरपंच हर्षद साळगांवकर, सत्यवान परब, बाळु प्रभु , शेखर काणेकर , सुनील घाग, पुंडलिक हळदणकर, शरद मेस्त्री, सुनील वारंग, राकेश परब, तेजस परब, महेश खानोलकर, अमर फटनाईक, निखील घाटकर, आर.टी.परब, दादा नवार, शाम नाडकर्णी, संतोष मोर्ये, रा.स्व. संघाचे गुरुप्रसाद खानोलकर इत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments